32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन अहवाल



32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन अहवाल

आयोजक : आदिवासी एकता परिषद 

ठिकाण: पानखेडा, साक्री, जि. धुळे

दिनांक: 13 जानेवारी 2025


आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक चैतन्याने संपन्न झाले. कार्यक्रमाने आदिवासी संस्कृतीचे वैभव, कलात्मक प्रतिभा, आव्हाने आणि सामाजिक योगदान इत्यादी विषयांवर विविध मान्यवरांच्या विचारांतून मंथन करण्यात आले. 


सत्र 1:


पहिल्या सत्रात आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला, संस्कृतीला अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.


1. आदिवासी दिनदर्शिका व पुस्तक प्रकाशन:

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आदिवासी दिनदर्शिका आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. हा उपक्रम आदिवासी इतिहास व परंपरांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न होता.



2. कवी संमेलन:

कवी संमेलनात आदिवासी जीवनशैली, निसर्ग व परंपरांवर आधारित सुंदर कविता सादर करण्यात आल्या. 



3. महिला सत्र:

महिलांच्या सत्रात महिलांनी आपली कला, कौशल्य आणि विचार व्यक्त केले.




नंदाबाई भिल यांचा सन्मान: आदिवासी समाजाच्या न्यायालयीन लढ्यात महत्त्वपूर्ण असा लढा लढणाऱ्या नंदाबाई भिल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


कीर्ती वरठा यांचे मनोगत: त्यांनी आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणाविषयी प्रेरणादायी विचार मांडले.


महिला नाटक सादरीकरण: आदिवासी एकल महिलांच्या जीवनावर आधारित नाटक सादर करून आपले सामाजिक भान जागृत केले.


कवयित्री कुसुमताई आलाम यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजापुढील आव्हाने याबाबत मत मांडले. 

कुसुमताई आलाम यांच्या मनोगतातील काही भाग


डॉ.हनी मोहानी (इरान) यांचे मनोगत: त्यांनी जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचे प्रश्न मांडत असताना समाजाची ताकद किती महत्त्वपूर्ण आहे यावर भाष्य केले. 

डॉ.हनी मोघाणी या संयुक्त राष्ट्र संघाच्या Member of Indigenous Peoples for permanent forum, आशियाचे प्रतिनिधित्व करतात.

डॉ.हनी मोघानी यांचे थोडक्यात मनोगत

आदिवासी एकता परिषद सांस्कृतिक महासंमेलन पानखेडा ता साक्री जि धुळे येथे उपस्थित

सुरेखा लेंभे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारांची देवाणघेवाण याबाबत आपले मनोगत मांडले.

सुरेखा लेंभे यांचे मनोगत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...


रंजना पावरा व इतर महिलांचे मनोगत: त्यांनी विविध समस्यांवरील विचार सादर करून महिलांच्या योगदानावर भर दिला.


सत्र 2 : युवा सत्र 

भारताच्या विविध राज्यांतून आलेल्या आदिवासी तरुणांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. जल, जंगल, जमिनीची लढाई ते आदिवासीच्या अस्तित्वाचा संघर्ष असे विविध मुद्दे चर्चेत आले. तरुणांचे हेच विचार येणाऱ्या काळात चळवळीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.



सत्र 3:


तिसऱ्या सत्रात आदिवासी बालकलाकारांनी आपल्या कौशल्याने आणि प्रतिभेने सगळ्यांची मने जिंकली.


आदिवासी मुलांच्या नृत्य, गाणे आणि इतर कलाकौशल्यांचे प्रदर्शन झाले. या सत्राने आदिवासी समाजाच्या नवीन पिढीचे कलात्मक व आशादायक दर्शन घडले.




या संपूर्ण दिवसभराच्या विविध कार्यक्रमात राज्यातील, देशातील, परदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 


आदिवासी एकता परिषदेच्या सर्व शिलेदारांनी पहिला दिवस अगदी काटेकोरपणे काम करून यशस्वी केला.




Raajoo Thokal 

Aboriginal Publication 





2 comments :

Anonymous said...

जय आदिवासी

Adivasiyat said...

Johar

 


आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts








Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.