वेबिनार : महाराष्ट्रातील आदिवासी जमातींचा आर्थिक विकास - समस्या आणि संधी


आदिवासी बांधवांचे अर्थशास्त्र हे त्यांच्या निसर्गाशी असलेल्या जवळीकतेवर आधारित आहे. त्यांची अर्थव्यवस्था ही पारंपरिक असून, त्यामध्ये स्वावलंबनाचे आणि साधेपणाचे दर्शन होते. परंतु, या समाजाला शोषण, विस्थापन आणि आधुनिक बदलांचा सामना करावा लागतो. त्यांच्या आर्थिक विकासासाठी शाश्वत पद्धतींचा अवलंब करणे, जंगल आणि जमिनीवरील त्यांचे हक्क कायम ठेवणे आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि आधुनिक पद्धतींचा योग्य समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु सरकारी पातळीवर असे होताना दिसत नाही. त्यामुळे आदिवासींच्या आर्थिक विकासात अनंत समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या जाणून घेतल्याशिवाय आपण नव्याने निर्माण होणाऱ्या संधी पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे यावर अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे. 

प्रा.डॉ.सुरेश देशमुख हे पुणे येथील मॉडर्न कॉलेज येथे गेल्या अनेक वर्षांपासून अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांनी आदिवासी बांधवांचे जीवन, संस्कृती, परंपरा या स्वत: अनुभवलेल्या आहेत. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते नेहमीच आधार बनत आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आदिवासी तरुणांपुढील आव्हानांचा डोळसपणे अभ्यास केलेला आहे. अशा या अनुभवी व अभ्यासू व्यक्तीकडून खरं तर सामाजिक कार्याचा एक नवा दृष्टीकोन आपणास मिळणार आहे.

चला तर मग या महत्त्वपूर्ण विषयावर होणा-या वेबिनारमध्ये सहभागी होऊ या.


विषय : महाराष्ट्रातील आदिवासी जमातींचा आर्थिक विकास - समस्या आणि संधी
व्याख्याते : प्रा.डॉ.सुरेश देशमुख
स्परूप : ऑनलाईन ( युट्यूब )
वार : रविवार 
दिनांक : 5 जानेवारी 2025
वेळ : सायंकाळी 8:00 वाजता

विषयांच्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करून आत्ताच नोंदवून ठेऊ शकता. 

आपलाच 
Admin
Aboriginal Publication

वेबिनार लिंक : 

0 comments :

 

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts




माती, बीज आणि ममता

माती, बीज आणि ममता




Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.