बंजारा एक आदिवासींचे शोषण करणारी जात...


The Challenge of Backwardness या W.V.Grigson यांच्या 1947 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात बंजारा समाजाबाबत खूप महत्त्वपूर्ण नोंदी करण्यात आलेल्या आहेत. हैदराबाद गॅझेटच्या आडून जी घुसखोरी आदिवासी समाजात होऊ पाहत आहे, त्या अनुषंगाने त्याच हैदराबाद सरकारमध्ये 1942 ते 1947 दरम्यान महसूल मंत्री असणाऱ्या ग्रीगसन यांच्या नोंदी महत्त्वपूर्ण व वास्तव मांडणाऱ्या ठरतात...

या पुस्तकात ग्रिगसन लिहितात, “This tribe must not be regarded as aboriginal, in view of its undoubted Rajputana origin…” यावरून बंजारा जमातीचे मूळ राजपुतान्यात आहे, तेथून ते दक्षिणेकडे आलेले आहेत. त्यामुळे त्यांना आदिवासी (aboriginal) समजणे चुकीचे ठरते असे त्यांनी ठामपणे मांडलेले आहे. 

तसेच पुढे पुस्तकात म्हटले आहे की, “…in the Nimar district of the Central Provinces Gond and Korku aboriginals used in the carrying days to be admitted into the Banjara community…” यावरून हे दिसून येते की बंजाऱ्यांनी स्वतःच्या समाजात गोंड, कोरकू यांसारख्या खऱ्या आदिवासींना सामावून घेतले. म्हणजेच बंजारा हा आदिवासी समाजाचा मूळ भाग नाही, तर उलट तो बाहेरून आलेला आहे आणि त्याने स्थानिक आदिवासींना सामावून घेतले आहे. खरं तर त्याकाळात आदिवासींना कोणत्या मार्गाचा वापर करून आणि का सामावून घेतले याची चिकित्सक चौकशी होणे आवश्यक आहे. 

तसेच पुढे ग्रिगसन लिहितात, “…except the darkest Malid and Melanid. Eickstedt draws attention to Gondid elements alongside Indid and Orientalid strains in this ‘exceptionally hybrid people’…” म्हणजेच बंजारा समाज हा मिश्र रक्तीय (hybrid) आहे, ज्यात गोंडसारख्या आदिवासींचा प्रभाव दिसतो, पण त्यांचे ते मूळ वंशज नाहीत. ते फक्त विविध जमातींचे मिश्रण झालेले आहेत. हे मिश्रण आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा हेतूने झालेले आहे हे आपणास पुस्तक बारकाईने वाचल्यावर समजून येते. 

आज बंजारा समाज कोणत्या मानसिकतेतून आदिवासी समाजात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे याचे उत्तर ग्रिगसन यांच्या पुस्तकात आपणास दिसून येते. ते लिहितात, “…the Banjara has, after a period in which he was regarded as a wandering criminal, naturally become pasturage-hungry and land-hungry and so, in the undeveloped tracts of Adilabad, Karimnagar and Warangal, an exploiter and expropriater of the aboriginal…” या वाक्याचा अर्थ असा की बंजारा समाजाने स्वतःच्या गुरे-ढोरे पाळण्यासाठी व शेतीसाठी आदिलाबाद, करीमनगर, वारंगल या भागात आदिवासींच्या जमिनीवर डोळा ठेवला आणि त्यांना जमीनदारीतून बेदखल केले. त्यामुळे बंजारा हा आदिवासी नसून आदिवासींचा शोषक आहे हे आपणास दिसून येते आणि त्याच विकृत इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आज सुरू आहे. 

ग्रीगसन पुढे असेही लिहितात, “…such a policy would be wrong in Adilabad, where the Banjara (especially the Mathura section) is steadily dispossessing the Gond and the Kolam of their lands.” म्हणजेच आदिलाबाद भागात विशेषतः मथुरा बंजारा गट सातत्याने गोंड आणि कोलाम या खऱ्या आदिवासींच्या जमिनी काबीज करत आहेत. यावरून बंजारा आदिवासी नसून आदिवासींचा जमीनदार-शोषक आहे हे स्पष्ट होते. तेव्हा त्यांनी गोंड व कोलाम या आदिवासी जमातींचे शोषण केले आणि आज त्यांना एकूणच 45 आदिवासी जमातींचे शोषण करण्याचा इरादा दिसत आहे. खरं तर त्या शोषणाचा हिशोब आज आदिवासींनी मागितला पाहिजे. आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी पुन्हा मिळविण्यासाठी एक दिलाने लढले पाहिजे. 


ग्रीगसन यांनी पुढे म्हटले आहे, “The notification might also therefore restrict special laoni to the aboriginals in those villages where the population of aboriginals (excluding Banjara, Mathura, Andh and Koli) is 40 per cent. of the total.” म्हणजेच, तत्कालीन सरकारनेच बंजारा, मथुरा, आंध व कोळी या जमातींना आदिवासी लोकसंख्येतून वगळलेले आहे. त्यामुळे हे समाज आदिवासी नसून वेगळ्या स्वरूपाचे आहेत हे तेव्हाच सिद्ध झालेले आहे. आज पुन्हा सिद्ध करण्याची गरज उरलेली नाही. 

पुढील उताऱ्यात स्पष्ट लिहिले आहे की, “The tribes to be notified for the tribal areas will be Gond (including Raj-Gond), Koya (including Racha-Koya), Pardhan, Thoti, Kolam, Naikpod and Ojha. Banjara, Andh and Koli may safely be omitted.” यावरून बंजारा हे अधिकृतपणे आदिवासी क्षेत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या जमातींच्या यादीत समाविष्ट नाहीत. उलट त्यांना 'safely omitted' म्हणजेच ठामपणे वगळण्यात आले आहे. इतकी स्पष्ट नोंद असताना आज बंजारा समाजाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देऊन आदिवासींच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली करणाऱ्या राजकीय नेत्यांना खरं तर आदिवासींनी जाब विचारण्याची गरज आहे. 

 बंजारा समाजाचे खरे रूप हे आदिवासींचे शोषण करणारे आहे यावर आज यानिमित्ताने बोलले गेले पाहिजे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले, पण बंजारा समाजाच्या शोषणाने ज्या आदिवासींना आपल्या जल, जंगल आणि जमिनीचे अधिकार गमवावे लागले, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानिक लढाई लढण्याची गरज आहे. त्यांनी केलेल्या शोषणाबाबत लिहिताना ग्रीगसन म्हणतात, “Most of the local Banjara are regular exploiters…” म्हणजेच स्थानिक बंजारा हे शोषण करणारे (exploiters) म्हणूनच ओळखले गेले आहेत. जर एखादा समाज आदिवासी असता, तर तो स्वतः शोषित असतो; पण बंजाऱ्यांना उलट शोषक म्हणून अधिकृत कागदपत्रांत नोंदवले गेले आहे.

याच पुस्तकात ग्रिगसन यांच्या सन 1943 च्या Aurangabad Tour Report मधील उतारा बंजारांच्या आदिवासी नसलेल्या स्वरूपाबाबत महत्त्वाचा पुरावा ठरतो. याबाबत ग्रीगसन यांनी लिहिले आहे, “The villages all have a large number of Banjara, who mostly claim to be of Rajput origin as distinct from Mathura Banjara…”  या वाक्याचा अर्थ असा की बंजारा स्वतःला राजपुत वंशज म्हणवतात. जर ते खरेच आदिवासी असते, तर त्यांना राजपुत मूळ सांगण्याची गरज नसती. हेच दाखवते की त्यांचा उगम हा आदिवासी नसून राजपुताना संस्कृतीशी निगडित आहे.

बंजारा हे हिंदू संस्कृतीशी आत्मसात झालेले आहेत आणि ते आदिवासी नाहीत याबाबत मांडणी करताना ग्रीगसन लिहितात, “…the Banjara are hinduised, and all the tribes have adapted themselves to their environment.” येथे थेट नमूद आहे की बंजारा Hinduised झाले आहेत, म्हणजेच त्यांनी स्वतःला हिंदू समाजात विलीन केले आहे. खरे आदिवासी आपली स्वतंत्र ओळख, परंपरा, भाषा व धार्मिक वैशिष्ट्ये जपून ठेवतात; पण बंजाऱ्यांनी आपली मूळ अस्मिता गमावून इतर समाजाची संस्कृती आत्मसात केलेली आहे. त्यामुळे त्यांना आदिवासी म्हणणे चुकीचे ठरते.


बंजारा व आदिवासी समाजामध्ये भिन्नता असल्याचे ग्रीगसन यांच्या मांडणीतून स्पष्ट दिसून येते. याबाबत त्यांनी असे म्हटले आहे की, “…In features both the Bhil and the Banjara seem to be a very mixed lot with features varying from hook-nosed Aryan to flat-nosed Gond types.” म्हणजेच बंजारा हा मिश्र रक्तीय समाज आहे. तो गोंडसारख्या आदिवासींशी काही प्रमाणात दिसण्यात मिळता जुळता असला तरी वंशपरंपरेने वेगळा आहे. त्यांची ओळख आदिवासी म्हणून न राहता संमिश्र व हिंदुकरण झालेला समाज अशी आहे.


वास्तविक बंजारा हे 'immigrants' आहेत, आदिवासी नाहीत याची स्पष्टता ग्रीगसन यांच्या पुढील वर्णनातून दिसून येते, “…to fight the exploitation (with their connivance) of the aboriginals by cleverer immigrants, such as the Banjara, the Maratha, the Brahman, the Muslim, the sahukar and the vakil…" येथे बंजारांना थेट 'immigrants' म्हणजेच बाहेरून आलेले स्थलांतरित म्हटले आहे. जर ते मूळ आदिवासी असते, तर त्यांना आदिवासी (aboriginal) म्हणून नोंदवले गेले असते; पण उलटपक्षी ते शोषक स्थलांतरित म्हणून ओळखले गेले आहेत. ज्या हैदराबाद गॅझेटचा दाखला वारंवार दिला जात आहे, त्यातही त्यांचा उल्लेख wandering tribe असाच अनेकदा केलेला आहे. 

बंजारा हे निव्वळ भटके नाहीत, तर आदिवासींचे शोषण करणारे आहेत यावर ग्रिगसन यांनी प्रकाश टाकलेला आहे. याबाबत लिहिताना ते म्हणतात, “…exploitation of the aboriginals by cleverer immigrants, such as the Banjara…” म्हणजेच बंजारा हे स्वतः शोषित नसून उलट आदिवासींचे शोषक आहेत. खरे आदिवासी म्हणजे शोषित व दबलेले गट; पण बंजारांना येथे शोषक म्हणून वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आदिवासी म्हणणे हे तर्कदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे.

आदिवासींच्या जमिनींवर डोळा ठेवणारे बंजारा आज आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करत आहे. आदिवासींच्या जमिनी, मजुरी व परंपरांचा गैरफायदा घेणारे म्हणून त्यांची गणना पूर्वीच झालेली झाली आहे. त्यामुळे सरकारने याची भरपाई कशी करता येईल यादृष्टीने खंबीर भूमिका घेणे आवश्यक आहे. 

Aboriginal Publication 
8108484499

0 comments :

 


आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts








Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.