गढी किल्ला - धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक पाऊलखुणांचा साक्षीदार लुप्त होण्याच्या मार्गावर....

गढी किल्ला - धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक पाऊलखुणांचा साक्षीदार लुप्त होण्याच्या मार्गावर....
- राजू ठोकळ 

धुळे जिल्ह्यातील पानखेडा गावातील गढी पाडा येथील गढी किल्ला एका लहानशा टेकडीवर वसलेला असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गढीच्या जागेवर उभे राहिल्यावर दुरपर्यंतचा परिसर सहजपणे नजरेस पडतो, ज्यामुळे हा किल्ला एके काळी संरक्षणासाठी महत्त्वाचा ठरला असावा. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा किल्ला एका राजाने बांधला, परंतु त्या राजाचे नाव मात्र अद्याप अज्ञात आहे. लोकांना नाव माहीत असेलही, परंतु माझ्या सारख्या अनोळखी व्यक्तीला ते सांगण्यास ते तयार नसावेत.

गढीच्या प्रवेशद्वारावर एका मोठ्या दगडी दरवाजाची चौकट आहे, जी तत्कालीन वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे. गढीचा पाया दगडी असून, त्यावर विटांचे अत्यंत देखणे बांधकाम केलेले आहे. गढीच्या बुरुजांमध्ये शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी छिद्रे केलेली आहेत. या छिद्रांमधून बंदुकींचा वापर करून दूर अंतरावर शत्रूंवर गोळीबार करण्याची योजना आखलेली दिसून येते.

गढीच्या आतमध्ये राजेशाही सौंदर्याने नटलेल्या खोल्या आहेत. याशिवाय, संडास आणि बाथरूमसाठी खास सोय केली असल्याचे दिसून येते, ज्यावरून त्या काळातील लोकांच्या सुविधा आणि वैभवपूर्ण जीवनशैलीची कल्पना येते. आतमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येण्यासाठी बांधकाम करताना पुरेशी काळजी घेतली असल्याचे दिसून येते. 

तथापि, सध्या गढी किल्ला दुर्लक्षित स्थितीत आहे. काही भाग कोसळलेला असून, त्याचा डोलारा आजही टिकून आहे, परंतु वेळेत दुरुस्ती आणि देखभाल झाली नाही तर हा ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्याचा धोका आहे.

हा किल्ला केवळ पानखेडा, पिंपळनेर गावाचा गौरव नसून, संपूर्ण राज्याच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रशासनाने आणि स्थानिक लोकांनी एकत्र येऊन गढीच्या जतनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. योग्य देखभाल आणि संवर्धन केल्यास गढी किल्ला भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरू शकतो.

- Aboriginal Publication

0 comments :

 


आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts








Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.