एक घनदाट जंगल होते. त्या घनदाट जंगलाच्या आत, बिताका नावाचं एक आदिवासी गाव होतं. त्या गावातील लोकांचा मुख्य आधार जंगलातील फळं, भाज्या आणि औषधी वनस्पती होत्या. मात्र, अचानक गावात एका दुर्धर आजाराचा प्रादुर्भाव झाला. लोक ताप, खोकला आणि अशक्तपणाने त्रस्त झाले.
गावातील किसना काका खूप चिंतेत होता. त्याला माहीत होते की या परिस्थितीत बाहेरच्या जगाकडून मदत मिळणे कठीण होतं. त्याने आपल्या गावातील वनौषधींचे ज्ञान असलेल्या पांडू भगतची भेट घेतली. त्याने सांगितलं की, त्या तिकडे बाडगीच्या बाजूला जे जंगल आहे, ते आपल्याला या परिस्थितीत जिवंत ठेवण्यास मदत करील आणि तेच आपल्याला या आजारातून बरे करण्यास मदत करील.
पांडू भगताने त्या जंगलातील झाडांच्या पानांपासून गावकऱ्यांना औषध तयार करायला शिकवलं. गुळवेलचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिला गेला, तुळशीचा काढा खोकल्यावर उपयोगी पडला आणि आवळ्याच्या सेवनाने गावकऱ्यांना आवश्यक पोषण मिळालं.
त्याचबरोबर पांडू भगताने गावकऱ्यांना योग्य आहार, स्वच्छता आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी दररोज सूर्यप्रकाशात वेळ घालवण्याचं महत्त्व सांगितलं. काही आठवड्यांत गावातील आजार कमी होऊ लागले, आणि लोक पुन्हा एकदा ताजेतवाने वाटू लागले.
किसना काकाने गावकऱ्यांना एकत्र जमवलं आणि म्हणाला, "आपण शिकायला हवं की जंगल आपल्या रोगांवर विजय मिळवण्याचं साधन आहे. जर आपण निसर्गाचं रक्षण करू, तर निसर्ग आपल्याला कधीच त्रास होऊ देणार नाही."
ही कथा आपल्याला शिकवते की आदिवासी जीवनशैलीत निसर्गाच्या औषधीय गुणांचा समावेश करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. नैसर्गिक साधनं आणि स्वच्छ जीवनशैली यांचा योग्य उपयोग केला, तर कोणत्याही आजारावर मात करता येऊ शकते.
कथेतील वर्णन जरी खरे असले तरी आज आपल्याला खरंच जंगल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का हा प्रश्न पडतो. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपण या बदलत्या काळात अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.
Aboriginal Publication
0 comments :
Post a Comment