चला आरोग्यावर बोलू काही....
भारतातील आदिवासी समाज हा आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्यामुळे ओळखला जातो. तथापि, आधुनिक युगातही आदिवासी समाजाला आरोग्याच्या दृष्टीने अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत. शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, निसर्गाचा ऱ्हास आणि शहरीकरणाचे वाढते प्रमाण यामुळे आदिवासींचे जीवन अधिकाधिक कठीण होत चालले आहे.
आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांचा अभाव, पोषणाचा अभाव आणि कुपोषण, संक्रमण आणि साथीचे आजार, मातामृत्यू आणि बालमृत्यू दर, आरोग्य शिक्षणाचा अभाव, मानसिक आरोग्याकडे केले जाणारे दुर्लक्ष्य, सांस्कृतिक संवेदनशीलतेचा अभाव, दारिद्र्य आणि दुर्बलता अशा अनेक समस्या आपल्याला आदिवासी भागात पहायला मिळतात. यावर सरकारी पातळीवर किती वेगात उपाय योजना आखल्या जातील याचे उत्तर आपल्याकडे कदाचित निश्चितपणे नसेल. असे असताना आपण सकारात्मक मार्ग काढण्यासाठी पर्यायी उपाययोजना काय करू शकतो यावर विचार मंथन करणे आवश्यक आहे. यातून निश्चित असे उत्तर मिळेल असेही नाही. परंतु यातून पुढे जाण्याचा विचार पेरला जाऊ शकतो या विश्वासासाने आपण या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केलेले आहे.
डॉ.नितिन बस्ते आणि आदिवासी यांचा अगदी जवळून संबंध आलेला आहे. त्यांनी आज पर्यंत हजारो आदिवासी बांधवांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच ते स्वत: एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर असल्याने देशाविदेशातील निसर्ग भटकंती करत असतात. या भटकंतीमध्ये त्यांचा आदिवासी बांधवांशी जवळून संबंध आलेला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपले संशोधन पेपर सादर केलेले आहेत.
चला तर मग आपल्या आदिवासी बांधवांच्या दैनंदिन जीवनातील एका मुलभूत प्रश्नावर चिकित्सकपणे संवाद साधूया.
विषय : आदिवासींची रोगप्रतिकारकशक्ती आणि आजच्या काळातील आव्हाने
व्याख्याते : डॉ. नितिन बस्ते
स्वरूप : युट्यूब ऑनलाईन
वार : रविवार
दिनांक : १५ डिसेंबर २०२४
वेळ : सांयकाळी ८ : ०० वाजता
मला खात्री आहे की आपण नक्की या वेबिनारचा एक भाग बनाल...
- Aboriginal Publication
वेबिनार लिंक
0 comments :
Post a Comment