आदरणीय मधुकर पिचड साहेब यांच्या जाण्याने अकोले तालुक्यातील आदिवासी पोरका झाला....
मधुकर पिचड हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव टाकला आणि दीर्घ काळ सक्रिय राजकारण केले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो.
🔺सुरुवातीचे जीवन आणि पार्श्वभूमी:
मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे शिक्षक होते.
शालेय प्राथमिक शिक्षण : राजूर
माध्यमिक शिक्षण : संगमनेर
पदवी : फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे ( 1962)
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजसेवा आणि राजकारणात पाऊल टाकले.
थोर विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक प्रा.ग.प्र.प्रधान सर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने नोकरी न करता राजकाराणार सक्रीय झाले.
अकोले तालुका हा मुख्यतः आदिवासीबहुल क्षेत्र आहे आणि पिचड यांचा लोकांशी जवळचा संपर्क असल्यामुळे त्यांना लवकरच लोकनेते म्हणून ओळख मिळाली.
त्यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमध्ये सुरु झाली असली तरी नंतरचा प्रवास इतर पक्षांतून झाल्याचे आपणास दिसून येते.
📖 राजकीय योगदान:
1. पंचायत समिती :
सन 1972 ते 1980 या कालावधीत अकोले तालुका पंचायत समिती सभापती म्हणून कामकाज केले.
2. जिल्हा परिषद
जिल्हा परिषद सदस्य म्हणून काही काळ काम केले.
3. विधानसभा निवडणूका :
1980 पासून अकोले विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सातत्याने निवडणुका जिंकल्या.
त्यांच्या नेतृत्वामुळे अकोले तालुक्यात अनेक विकास प्रकल्प उभारले गेले.
📖 मंत्रीपदाची जबाबदारी:
1980 ते 1985 विधानसभा अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख म्हणून काम केले.
जून 1985 ते 1986 महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पद, 27 जून 1988 ते 12 मार्च 1990 कृषी, रो.हमी योजना, आदिवासी विकास, दुग्धविकास पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री
28 जून 1991 ते नोव्हेंबर 1996 आदिवासी विकास, वन व पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्री
19 ऑगस्ट ते ऑक्टोबर 2004 आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री
11 जून 2013 , आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड
महाराष्ट्र सरकारमध्ये राजस्व, जलसंपदा आणि ग्रामीण विकास मंत्रालयांसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
त्यांचा कार्यकाळ विविध विकास योजनांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय ठरला.
आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अधिक प्रभावशाली राहिली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम
📖 विरोधी पक्षनेता :
25 मार्च ते 25 जुलै 1999 विधानसभा विरोधी पक्षनेते
त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्यांच्या कार्यकाळात सभागृहात शिस्त आणि प्रभावी कार्यवाही दिसून आली.
सामाजिक कार्य :
7 ऑक्टोबर 2001 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेवर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड
📖 भाजपमध्ये प्रवेश:
2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यांनी भाजपसाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर कार्य केले.
🔺 महत्वाची कामगिरी:
1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना
आदिवासी विकास: अकोले तालुक्यातील आदिवासी समाजासाठी त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.
जलसिंचन प्रकल्प: पाण्याच्या समस्येसाठी त्यांनी विविध प्रकल्प राबवले.
शेतकरी मदत: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि पिकविमा योजनांसाठी त्यांनी प्रयत्न केले.
सहकार क्षेत्र : अकोले तालुक्याच्या सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले.
आदिवासी न्यायालयीन लढा : धनगर आरक्षण असो वा बोगस आदिवासी यांच्या विरोधातील लढाई त्यांनी अधिक ताकदीने लढली.
आदिवासी विकास विभाग : स्वतंत्र आदिवासी विकास विभागाच्या निर्मितीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.
आदिवासी जात पडताळणी समिती : आदिवासी जमातीत होणारी बोगस घुसखोरी रोखण्यासाठी डॉ. गोविंद गारे साहेब यांच्या संकल्पनेतून आदिवासी जात पडताळणी समितीची स्थापना करून आदिवासीच्या हक्काची होणारी चोरी रोखण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला.
🔺 वैयक्तिक जीवन:
साधेपणा हा त्यांचा स्वभाव होता आणि ते नेहमी जनतेशी संवाद साधत.
त्यांनी समाजाच्या सर्व स्तरांशी जवळीक ठेवत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला.
अकोले तालुक्यातील पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
🙏 निधन:
त्यांचे 6 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा एक प्रभावी नेता हरपला. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक पटलावर एक पोकळी निर्माण झालेली आहे.
पिचड साहेबांचा वैचारिक व राजकीय कार्याचा वारसा चालविण्यासाठी अकोले तालुक्याच्या जनतेतून नेतृत्व निर्माण होण्याची गरज आता नेहमीच राहील.....
पिचड साहेबांना अखेरचा जोहार....
-राजू ठोकळ
Aboriginal Publication
0 comments :
Post a Comment