टोटेम - ढवळा ढेंगळे | वेबिनार | Youtube | Aboriginal Publication



आदिवासी संस्कृतीतील कुलचिन्ह 'टोटेम' - शाहीर ढवळा ढेंगळे 

आदिवासी जंगलचे राजे असून त्यांचे अस्तित्व जंगलातील साधन संपत्तीवर अवलंबून आहे. पिढ्यांपिढ्यांच्या वास्तव्यामुळे आजूबाजूची नैसर्गिक परिसंस्था आणि आदिवासी यांच्यात एक साहचाऱ्याचा नातेसंबंध दिसतो. कुलचिन्हांच्या शिस्तबध्द नियंत्रणाद्वारे हा नातेसंबंध अधिकाधिक दृढ व स्पष्ट झालेला आहे. परंतु दुर्दैवाने सरकार असो वा पर्यावरण संरक्षणाबाबत काम करणारी कोणतीही संस्था असो, यांना ही व्यवस्था जाणवत नाही. त्यामुळे आदिवासी व सरकारी यंत्रणा यांच्या संघर्षात पर्यावरण संवर्धन व निसर्ग संस्कृती जतन या महत्त्वपूर्ण बाबी बाजूला पडतात. या संघर्षात फक्त आदिवासींचे नुकसान होते असे नाही, तर संपूर्ण मानवजातीचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. आज आदिवासी संस्कृतीवर विविध आक्रमणे होत आहेत. यांना प्रतिकार करायचा असेल तर आदिवासी संस्कृतीतील कुलचिन्ह म्हणजेच 'टोटेम' समजून घेणे आवश्यक आहे. शाहीर ढवळा ढेंगळे हे स्वत: शाहीर असल्याने त्यांनी आदिवासी संस्कृतीवर आज पर्यंत विविध ठिकाणी प्रबोधन केलेले आहे. त्यांचा टोटेम या विषयावर अभ्यास सुरु असून एक सखोल मांडणी आपल्या समोर करण्याचा प्रयत्न ते या युट्यूब वेबिनारच्या माध्यमातून करणार आहेत.


वेबिनार नक्की कोणासाठी?

आदिवासी कुलचिन्ह अर्थात टोटेमबाबत खालील प्रश्न आपल्या मनात आहेत का? जर खालील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा असेल तर हे वेबिनार आपल्यासाठी आहे.... आणि आपण जरूर याचा भाग बनाल....


1) आदिवासी साहित्य निर्मितीबाबत आपणास काय वाटते?

2) सह्याद्रीत अनेक चळवळी उदयास आल्या... बहरल्या... पण ठराविक उंची गाठल्यावर त्या लुप्त झाल्या असे मला तरी वाटते. याबाबत आपलं काय मत आहे? जर आपलेही हेच मत असेल तर असे का घडत असावे?

3) टोटेमिझमच्या उत्पत्तीबाबत आपले मत काय आहे?

4) आदिवासिंमधील कुलचिन्हपद्धतीमुळे निसर्गाचे संरक्षण होण्यास कशी मदत होते?

5) मानववंशशास्त्राच्यादृष्टीने कुलचिन्हाचे काही महत्त्व आहे का? असेल तर ते कसे?

6) आदिवासी कुलचिन्ह पाळतात म्हणजे नक्की काय करतात?

7) आज आदिवासीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची घुसखोरी होत आहे. याला रोखण्यासाठी कुलचिन्हाचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो का?

8) गोंदण आणि कुलचिन्ह यांचा काही सहसंबंध आहे का? 

9) आदिवासी कुलचिन्ह आदिवासी इतिहास संशोधनाची साधने होऊ शकतात का? 

10) टोटेम अथवा टोटेमवाद या विषयाचा आवाका किती आहे?

11) नागरी समाजातही कुळ गोत्र आहे त्या बद्दल आपणास काय वाटते? 

12) आदिवासी आणि धर्म हा विषय बऱ्याच वेळा चर्चेला येतो. टोटेमचा त्याच्याशी काही संबंध आहे का?

13) आदिवासी हिंदूच आहेत अशी मांडणी बरेचजण करताना दिसतात. याबाबत एक आदिवासी म्हणून आपण काय मत मांडता? 

14) जगभरात टोटेम कुठे कुठे आहे?

15) सिंधू संस्कृती आपली होती असे काहींचे मत आहे.

16) शहरातील आदिवासिंचे टोटेमशी कसे संबंध आहेत?

17) आदिवासीमधील घुसखोरी रोखण्यासाठी टोटेमच्या मांडणीची कशी मदत होऊ शकते? 

18) महाराष्ट्रातील आदिवासी जमातीन्नी येणाऱ्या काळात साहित्य निर्मिती क्षेत्रात कोणत्या घटकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे?

आपण मन लावून प्रश्न वाचले असतील असा मला विश्वास आहे. हे प्रश्न नाहीत खरे तर... त्या सांस्कृतिक मौलिक परंपरा आहेत. त्या विस्मृतीत जाऊ लागल्याने प्रश्न म्हणून आज आपल्यापुढे येत आहेत. त्यावर मंथन होणे ही काळाची गरज आहे. 

संस्कृती संवर्धन करताना संस्कृतीचा पाया अधिक सक्षमपणे आपणास माहीत असायला हवा. निव्वळ भीती दाखवून कोणतेही काम सार्थकी लावता येत नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे विचारमंथन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे. चला तर मग सर्व मिळून आपल्या सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून घेऊया...

विषय - आदिवासी संस्कृतीतील कुलचिन्ह / टोटेम 
व्याख्याते - शाहीर ढवळा ढेंगळे, आदिवासी एकता परिषद, पुणे 
वार - मंगळवार 
दिनांक - 3/12/2024
वेळ - सायंकाळी 8:00 वाजता 
व्याख्यानाचे स्वरूप - ऑनलाईन (Youtube) 

व्याख्यानाची लिंक 

सदर व्याख्यानाबाबत कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर निसंकोचपणे आपण 𝙰𝚋𝚘𝚛𝚒𝚐𝚒𝚗𝚊𝚕  𝙿𝚞𝚋𝚕𝚒𝚌𝚊𝚝𝚒𝚘𝚗 च्या टीमला 9595959357 या नंबरवर व्हाट्सअप करू शकता...!

-राजू ठोकळ




0 comments :

 

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts




माती, बीज आणि ममता

माती, बीज आणि ममता




Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.